दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:36 PM2018-02-25T23:36:23+5:302018-02-25T23:36:23+5:30

दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, सयंम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते.

The Right to Live by Divya | दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय राठोड : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

ऑनलाईन लोकमत
दारव्हा : दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, सयंम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते. त्यामुळेच समाजात सुदृढ व्यक्तींप्रमाणेच दिव्यांगांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.
दारव्हा नगरपरिषदेतर्फे संत गाडेगबाबा जयंतीनिमित्त राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आयोजित दिव्यांग मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भाऊसाहेब इरवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष मनोज सिंगी आदी उपस्थित होते.
दारव्हा नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी खर्च करावयाच्या तीन टक्के रकमेतून १६५ दिव्यांगांना प्रत्येकी चार हजार २०० रुपयांचे अर्थसहाय्य देऊन या व्यक्तींना स्वबळावर उभं राहण्याची संधी दिली, असे कौतुकोद्गार ना. राठोड यांनी काढले.
नगराध्यक्ष भाऊसाहेब इरवे यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी १६५ दिव्यांग निधी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. २० दिव्यांगांना ना. संजय राठोड आणि मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे निधीचे वाटप करण्यात आले तर, उर्वरित व्यक्तींच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे निधी थेट जमा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, नगरपरिषद बांधकाम सभापती अरविंद निंबरते, पाणीपुरवठा सभापती दीपा सिंगी, शिक्षण सभापती जयश्री खरोडे, महिला व बालकल्याण उपसभापती वैशाली खाटिक, नगरसेवक प्रकाश दुधे, रवी तरटे, आरिफ काझी, बाशिद खान, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प अधिकारी हरिष भिसे यांनी केले. संचालन रूचिरा कापसे यांनी तर, आभार प्रदर्शन रमेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे कर्मचारी मीनाक्षी दुधे, जीवन सुर्यवंशी, रवी राऊत, सय्यद अफसर, गोपाल यादव आदिंनी परिश्रम घेतले.

Web Title: The Right to Live by Divya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.