वर्धा नदी खोऱ्यात रेती तस्करांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:18 AM2019-02-13T00:18:59+5:302019-02-13T00:19:22+5:30

वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे.

Panic scare of Wardha river valley | वर्धा नदी खोऱ्यात रेती तस्करांची दहशत

वर्धा नदी खोऱ्यात रेती तस्करांची दहशत

Next
ठळक मुद्देलाखो रूपयांचा माल लंपास : महसूल विभागाच्या ‘मधूर’ संबंधाने चोरट्यांची चांदी

मो.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे. या विषयात महसूल विभागाने डोळ्यावर पट्ट्या बांधल्या असून तस्करांशी असलेले मधूर संंबंधच रेतीच्या चोरीला चालना देत असल्याचे बोलले जात आहे.
रेती घाटांचे लिलाव न्यायालयीन प्रक्रियेत अडकून असल्याने सध्या सर्वत्र रेती टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे सर्वसामान्यांची बांधकामे प्रभावित झाली असली तरी बांधकाम व्यावसायिकांना मात्र सहजरित्या रेती उपलब्ध होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांनी वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीच्या खोºयात अक्षरश: आपला ठिय्या मांडला आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी या नदीतून केली जात आहे. यासंदर्भात काही गावातील पोलीस पाटलांनी महसूल विभागाला तोंडी माहिती दिली. परंतु महसूल विभागाकडून या तस्करांविरूद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. दिवसा नदीतून रेती पळवायची, त्याचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस परिसरात करायचा आणि रात्रीच्यावेळी वणी परिसरातून मागणी केलेल्या ठिकाणावर ती रेती पोहोचवायची, असा गोरखधंदाच या तस्करांनी सुरू केला आहे.
रेतीघाट सुरू असताना रेतीची किंमत प्रति ब्रास दोन ते अडीच हजार रूपये होती. मात्र रेतीघाट बंद असल्याने चोरीच्या रेतीची किंमत दुप्पट झाली आहे. ज्यांना गरज आहे, ते लोक दामदुप्पट पैसे मोजून रेती खरेदी करीत आहे. वणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहे. या बांधकामांवर रेती कुठून पुरविली जाते, याची साधी चौकशी करण्याचे सौजन्यदेखिल महसूल विभागाकडून दाखविले जात नाही.
महसूल विभागाचे काही कर्मचारीच या तस्करांशी संधान साधून असून वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करून तस्करांना ते सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे. वणी तालुक्यातून विदर्भा, निगुर्डा व वर्धा या प्रमुख नद्या वाहतात. यंदा सुरूवातीला या नद्यांना पुर आल्याने या नदीत चांगल्या प्रतीची वाळू आली आहे. मात्र अद्याप रेती घाटाचे लिलाव न झाल्याने या नदीतील रेतीचा अधिकृत उपसा बंद आहे. त्यामुळे रेती तस्करांनी सध्या डोकेवर काढले असून चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्करांनी या परिसरात आपले एजंट नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून चोरटी रेती पुरविली जाते.

‘रात्रीस खेळ चाले’
चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूचे तस्कर वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीतून रेती लंपास करतात. त्याची साठवणूक घुग्गूस येथे केल्यानंतर रात्रीच्या अंधारात ती वाळू वणी परिसरात पोहोचविली जात आहे. मध्यंतरी महसूल विभागाने या तस्करीविरूद्ध पाश आवळले होते. परंतु नंतर कारवाया थंडावल्या.

Web Title: Panic scare of Wardha river valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू