घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:57 PM2018-02-05T23:57:03+5:302018-02-05T23:57:32+5:30

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे.

Panganga's character dry in Ghatanji taluka | घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीवांची भटकंती : मोटारपंपाने शेतीसाठी पाण्याचा उपसा

आॅनलाईन लोकमत
घाटंजी : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे. नाही म्हणता ताडसावळी गावाजवळ नदीच्या पात्रात क्वचितच ठिकाणी पाण्याचे डबके दिसतात. पण त्या डबक्यातून काही लोक मोटारपंप लाऊन शेतीसाठी पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे काही दिवसातच तेही डबके कोरडे पडणार आहे. गुरे तसेच वन्य प्राण्यांचे पाण्यापासून हाल होणार आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी मानव वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घेऊन नदीवरील मोटारपंप त्वरित बंद करावे आणि मुक्या प्राण्यांसाठी पाणीसाठा वाचवून ठेवावा, अशी मागणी ताडसावळीचे माजी सरपंच जयंत चिल्लावार यांनी केली आहे.
परिसरातील नाल्यांना थेंबभरही पाणी नाही. रानावनातून गावाकडे निघालेल्या जनावरांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. गावात कुठेही हौद नाही किंवा इतर पाण्याची सोय नाही. त्यामुळे पशुधनपालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Panganga's character dry in Ghatanji taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.