यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:33 PM2020-01-13T13:33:50+5:302020-01-13T13:50:51+5:30
यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी अखेर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी (13 जानेवारी) अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसची क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली.
नामांकन दाखल करण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत वेळ होती. मात्र या वेळेत केवळ कालिंदा पवार व कामारकर यांचेच नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. 18 सदस्य असलेल्या भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत काही तडजोडी होते का या दृष्टीने प्रयत्न केले. सदस्यांची बैठकही घेतली. परंतु महाविकास आघाडी एकजूट असल्याने भाजपाला यश आले नाही. शिवसेनेने शिक्षण सभापती असलेल्या कालिंदा पवार यांना बढती देत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद दिले. या माध्यमातून वनमंत्री संजय राठोड यांनी अध्यक्षपद आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात नेले आणि कालिंदा पवार यांना अध्यक्षपदी संधी देऊन मराठा समाजाला खूश करण्याचाही प्रयत्न केला.
उपाध्यक्ष पदावर क्रांती कामारकर यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांचे वर्चस्व राहिल्याचे मानले जाते. महाविकासआघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसला दोन सभापती पदे दिली जाणार आहेत. तर अन्य दोन सभापतीपदावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Attack : JNU हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस
यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा
जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप
JNU भेटीचा दीपिका पादुकोणला असाही फटका, वाचा सविस्तर
ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं