वेडदवासीयांचे तहसीलसमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:19 AM2017-11-25T00:19:42+5:302017-11-25T00:20:15+5:30

वेडद येथील ग्रामसेवकाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी वेडदवासियांनी गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.

Incessant fasting in front of the tehsil of the Vedas | वेडदवासीयांचे तहसीलसमोर बेमुदत उपोषण

वेडदवासीयांचे तहसीलसमोर बेमुदत उपोषण

Next
ठळक मुद्देवेडदवासियांनी गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : वेडद येथील ग्रामसेवकाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी वेडदवासियांनी गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
यासंदर्भात यापूर्वीच गटविकास अधिकाºयाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने गावकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वेडद येथील ग्रामसेवक वार्षिक जमा खर्च अहवाल तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून गावातील विकासात्मक कामे करण्यासाठी सभा घेत नसल्याचा आरोप आहे. स्वत:च्या मर्जीने कामे निकृष्ठ दर्जाची करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
या उपोषणात भीमराव सोयाम, प्रदीप निखाडे, पांडुरंग काटवले, हरिदास सुरपाम, आकाश ढोले, रामदास किन्नाके, संदीप मेश्राम, रमेश चंदनखेडे, संजय बोरकर, संतोष जगताप, राजू टोंगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Web Title: Incessant fasting in front of the tehsil of the Vedas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.