अखेर ‘त्या’ पोस्टमन विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:22 PM2018-03-14T22:22:12+5:302018-03-14T22:22:12+5:30

लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले.

Finally, he filed a complaint against the postman | अखेर ‘त्या’ पोस्टमन विरोधात गुन्हा दाखल

अखेर ‘त्या’ पोस्टमन विरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देआधारकार्ड : डाक विभागाला थांगपत्ता नाही

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : लोहारा परिसरातील ग्रामस्थांनी २०१३ ते २०१५ या वर्षात काढलेले आधारकार्ड पोस्टाने त्यांच्या घरी पोहोचलेच नाही. या घटनेचे बिंग २०१८ मध्ये रविवारी फुटले. साई मंदिर परिसरात गाळ काढताना विहिरीत तब्बल १५२ आधारकार्ड असलेली कॅरीबॅगच सापडली. आता या प्रकरणी अज्ञात पोस्टमन विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात नायब तहसीलदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
आधारकार्ड बेवारस स्थितीत मिळाल्याच्या घटनेची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दखल घेत तहसीलदार सचिन शेजाळ यांना चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या तक्रारीवरून डाक विभागातील अज्ञात पोस्टमनविरोधात भादंवि ४०९ नुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डाक विभागातून वाटपासाठी गेलेले आधारकार्ड परस्परच फेकून देण्यात आले. या गंभीर प्रकरणाची अद्यापपर्यंत डाक विभागाने दखल घेतली नाही. याबाबत कार्यालयीन चौकशी करून त्या काळात लोहारा परिसरासाठी कोण पोस्टमन कार्यरत होता त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. आता प्रकरण पोलिसांकडे गेल्याने सर्वच जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
डाक विभागाच्या अनियंत्रित कारभाराचा हा धडधडीत पुरावा हाती लागला आहे. यवतमाळच्या डाक विभागाचे अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने अनेक गंभीर प्रकरणे येथे घडत आहे. यापूर्वीही थेट हरियाणा येथून घातक शस्त्रे कुरिअरद्वारे एका युवकाने बोलाविली होती. या प्रकरणातही पोलीस चौकशी झाली. मात्र कार्यालयातून आपल्या कर्मचाऱ्यांना अभय देण्याचे काम करण्यात आले. आताही आधारकार्डाचे गंभीर प्रकरण बाहेर आले असताना ठोस कारवाई झालेली दिसत नाही.
संशयाच्या भोवऱ्यात
डाक विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. विविध शासकीय दस्ताऐवज नव्या नियमाप्रमाणे थेट डाक विभागाच्या माध्यमातून घरापर्यंत पाठविले जातात. वाहनांचे आरसी बुक, परवाना व इतरही महत्त्वाचे दस्तऐवज अशा पद्धतीने बाहेर फेकले जात असेल तर संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Finally, he filed a complaint against the postman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.