शेतकऱ्याचे आत्मदहन

By admin | Published: April 4, 2017 05:51 AM2017-04-04T05:51:46+5:302017-04-04T05:51:46+5:30

अल्पभूधारक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना तालुक्यातील बारड (पुनर्वसन) येथे रविवारी मध्यरात्री घडली.

Farmer's self-destruction | शेतकऱ्याचे आत्मदहन

शेतकऱ्याचे आत्मदहन

Next

बाभूळगाव (यवतमाळ) : अल्पभूधारक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना तालुक्यातील बारड (पुनर्वसन) येथे रविवारी मध्यरात्री घडली. शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विनोद रामचंद्र भोयर (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विनोदकडे तालुक्यातील कोंढा येथे सात एकर कोरडवाहू जमीन आहे. रविवारी सायंकाळी कोंढा येथे जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सोमवारी सकाळी प्रात:विधीला जाणाऱ्या नागरिकांना बारड येथे कोळसा झालेला मृतदेह आढळला. मृतदेहा शेजारी पेट्रोलचा डबा, आगपेटी, मोबाइल, चप्पल आदी वस्तू पडल्या होत्या. त्याने ही टोकाची भूमिका का घेतली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याच्यावर कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
>नांदेडमध्ये दोन आत्महत्या
नांदेड : नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून मौजे सिंगोडा (ता. किनवट) येथील भारत लखू पवार (५०) व धानोरा (म.) (ता. लोहा) येथील नामदेव मारोती माटोरे या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या तीन दिवसांत घडल्या.

Web Title: Farmer's self-destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.