९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात वैदर्भीय साहित्यिकांच्या नावांची प्रवेशद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:26 PM2019-01-10T20:26:10+5:302019-01-10T20:27:03+5:30

९२ व्या साहित्य संमेलनस्थळी उभारण्यात आलेली विविध प्रवेशद्वारांना विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत.

Entrance gate on the names of Vidarbha literary names in the Marathi Sahitya Sammelan | ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात वैदर्भीय साहित्यिकांच्या नावांची प्रवेशद्वारे

९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात वैदर्भीय साहित्यिकांच्या नावांची प्रवेशद्वारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ:

संमेलनाच्या निमित्ताने या ज्येष्ठांच्या साहित्याचे व कार्याचे स्मरण व माहिती नव्या पिढीला होत आहे.
संमेलन होत असलेल्या समता मैदानातील संमेलन स्थळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. ज्या सभामंडपात मुख्य कार्यक्रम होत आहे त्याचे नामकरण प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ असे तर या परिसराला शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर असे संबोधले जात आहे. याव्यतिरिक्त संमेलनस्थळाजवळील मार्गांवर अनेक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यांनाही विविध साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. या परिसरात प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारांना, स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. य. खु. देशपांडे प्रवेशद्वार, सी.डी. नाईक स्मृती प्रवेशद्वार, कवयित्री विजया एम्बेडवार स्मृती प्रवेशद्वार, टिळक स्मारक भवनाला वºहाडचे इतिहासकार या.मा. काळे प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहेत.
मुख्य सभामंडपाच्या बाजूलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी आहे. यात विविध प्रकाशकांचे स्टॉल्स लागलेले आहेत.
कविता सादर करण्यासाठी यवतमाळचे ज्येष्ठ कवी शंकर बडे कट्टा परिसर आणि कवी शिवा राऊत व्यासपीठ सज्ज आहे. यवतमाळ येथील बचतभवन येथे प्रा. शरच्चंद्र टोंगो व्यासपीठ तयार केले असून तेथे परिसंवादांचे आयोजन केले आहे.
 

Web Title: Entrance gate on the names of Vidarbha literary names in the Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.