श्रीमंताचे अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:19 PM2019-05-08T22:19:03+5:302019-05-08T22:19:31+5:30

शहरातील दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अ‍ॅप्रोच रोडवर अनेक बड्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटविल्यराने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

The encroachment of the rich is destroyed | श्रीमंताचे अतिक्रमण जमीनदोस्त

श्रीमंताचे अतिक्रमण जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देपालिकेची कारवाई : दारव्हा मार्गावरील शो-रूम, हॉटेल्स हटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अ‍ॅप्रोच रोडवर अनेक बड्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटविल्यराने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
अतिक्रमणामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. बसस्थानक चौक ते लोहारा चौक हा रस्ता दुपदरी असला, तरी अनेक ठिकाणी अरूंद झाला होता. परिणामी अपघात घडत होते. नगरपरिषद अतिक्रमण विभागाने बुधवारी दुपारी मोहीम हाती घेतली. तत्पूर्वी सर्व व्यावसायीकांना नोटीस बजावली. अनेक दुचाकी, चारचाकी शोरूम चालकांनी मालकीची जागा असल्याप्रमाणे पक्के अतिक्रमण केले होते. रोडवर चक्क पेवर ब्लॉक बसवून शेड उभारले होते. यामुळे कॉलनीमधून येणाऱ्या व्यक्तीला थेट मुख्य मार्गावर यावे लागत होते. त्यामुळे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या निर्देशावरून अतिक्रमण विभाग प्रमुख डी.एम. मेश्राम यांनी श्रीमंताचे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. अनेकांनी अतिक्रमण स्वत:हून काढणार असल्याचे सांगितले.

Web Title: The encroachment of the rich is destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.