जिल्हा प्रशासनाचा करणार निषेध

By admin | Published: August 3, 2015 02:21 AM2015-08-03T02:21:47+5:302015-08-03T02:21:47+5:30

सेतू व नायब तहसीलदाराविरूद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी ...

District administration refuses to do so | जिल्हा प्रशासनाचा करणार निषेध

जिल्हा प्रशासनाचा करणार निषेध

Next

वणी : सेतू व नायब तहसीलदाराविरूद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे. याबाबत दिलीप भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
मारेगाव येथील नायब तहसीलदारांनी शासनाची फसगत करून ते मुख्यालयी न राहता घरभाड्याची उचल करीत असल्याची तक्रार दिलीप भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तसेच जिल्ह्यातील सेतू सुविधाधारक कंपनी ही कंत्राटीचे अनेक नियम व उल्लंघन करून सेतू चालवित आहे.
त्यामुळे त्यांच्याकडील कंत्राट रद्द करावा. सेतू केंद्र हे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, सुशिक्षित बेरोजगार, दारिद्र्यरेषेखालील महिला व पुरूष बचत गटांना देण्यात यावे. सेतू सुविधा केंद्रातून आॅफलाईन सातबारा व आठ अ ची १८२ प्रमाणपत्रे वितरित केली आहे. परंतु या प्रमाणपत्राची रक्कम सेतूधारकांनी शासनाच्या खात्यात जमा न करता ती हडप केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
सेतूच्या सुविधांबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या गैरसोयीबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्याची दखलच घेण्यात आली नाही. हस्तलिखीत पावतीवर शासनाचे उलटे शिक्के मारून शासनाच्या राज्यस्तंभाचा अपमान येथील सेतू केंद्राने केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भोयर यांनी निवेदनातून केली आहे.
सेतू सुविधा केंद्र व निवासी नायब तहसीलदार यांच्यावर शासनाकडून १२ आॅगस्टपर्यंत सक्त कारवाई न केल्यास नाईलाजास्तव येथील तहसील कार्यालयासमोर १५ आॅगस्टाला जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदविणार असल्याचे दिलीप भोयर यांनी निवेदनात म्हटले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: District administration refuses to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.