युवक काँग्रेसच्या माजी पदाधिका-यावर अत्याचाराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 06:35 PM2017-11-13T18:35:47+5:302017-11-13T18:37:22+5:30

वणी: विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या एका माजी पदाधिका-याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

The crime of atrocities against former office bearer of Youth Congress | युवक काँग्रेसच्या माजी पदाधिका-यावर अत्याचाराचा गुन्हा

युवक काँग्रेसच्या माजी पदाधिका-यावर अत्याचाराचा गुन्हा

Next

वणी: विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या एका माजी पदाधिका-याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भास्कर वसंतराव गोरे (३८) असे आरोपीचे नाव असून वणी शहरातील एका महिलेच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. तो पंचायत समितीचा कंत्राटदारदेखील आहे.

गेल्या तीन वर्षांपासून भास्कर गोरे हा ब्लॅकमेल करून आपल्यावर अत्याचार करीत होता, अशी तक्रार पीडित महिलेने रविवारी वणी पोलीस ठाण्यात दाखल केली. भास्करने सुरूवातीला पीडित महिलेच्या पतीशी मैत्री केली. त्यानंतर तिला अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी लावून देतो असे सांगून तिच्याकडून ६० हजार रुपये उकळले. सोबतच तिचे दागिणेही गहाण ठेवण्यासाठी मागितले. त्यानंतर भास्करने आणखी दोन लाख ६५ हजार रुपयांची आपल्याला मागणी केली, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

यादरम्यान, भास्करने आपल्याशी लगट करून आपले अश्लील व्हिडीओ, तसेच आॅडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे सुरू केले. १४ नोव्हेंबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१७ या काळात भास्करने प्रगतीनगरमधील एका घरी नेऊन आपल्यावर सातत्याने अत्याचार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रविवारी पिडित महिला व तिच्या पतीने वणी पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भास्कर गोरे याच्याविरुद्ध भादंवि ३७६ (२) एन, ३५४ (सी), ३८७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी आरोपी भास्कर गोरे याला वणीच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ विजय लगारे, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरलीधर गाडेमोडे करीत आहेत.

Web Title: The crime of atrocities against former office bearer of Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा