‘चीत पट’ क्रीडाविश्वाचा संदर्भ ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 09:52 PM2018-06-25T21:52:24+5:302018-06-25T21:52:44+5:30

‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी नीलेश भगत यांचे ‘चीत पट’ पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाचा संदर्भ ग्रंथ आहे, असे कौतुकोद्गार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काढले. नीलेश भगत लिखित ‘चीत पट’ पुस्तकाचे लोकार्पण येथील नेहरू स्टेडियमच्या सभागृहात ना. संजय राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

'Chit pat' sports reference book | ‘चीत पट’ क्रीडाविश्वाचा संदर्भ ग्रंथ

‘चीत पट’ क्रीडाविश्वाचा संदर्भ ग्रंथ

Next
ठळक मुद्देसंजय राठोड : ‘लोकमत’ क्रीडा प्रतिनिधीच्या पुस्तकाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी नीलेश भगत यांचे ‘चीत पट’ पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाचा संदर्भ ग्रंथ आहे, असे कौतुकोद्गार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काढले. नीलेश भगत लिखित ‘चीत पट’ पुस्तकाचे लोकार्पण येथील नेहरू स्टेडियमच्या सभागृहात ना. संजय राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा भारती यवतमाळचे अध्यक्ष सतीश फाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कबड्डीपटू प्यारेलाल पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, कौशल्य विकास विभाग नागपूरचे प्रभारी सहायक संचालक शैलेश भगत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू जिद्दीच्या बळावर उत्तुंग यश मिळवितात, याचा अभिमान वाटतो. नीलेश भगत यांनी अशाच उत्तुंग व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘लोकमत’मध्ये सविस्तर लिहिले. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, असे ते म्हणाले. शाळांमधून या पुस्तकाचे वितरण व्हावे, यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नीलेश भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तक विक्रीतून उभा झालेला पैसा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठीच खर्च केला जाईल. खेळाडू व शारीरिक शिक्षकांना या रकमेतून पुरस्कार देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुस्तकाच्या निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल पराग पिंगळे, शब्दयात्रा प्रकाशनचे नितीन पखाले, प्रा. डॉ. शांतरक्षित गावंडे, अमोल बोदडे, आनंद भुसारी, मीरा फडणीस यांच्यासह नीलेश भगत यांच्या आई जनाबाई, पत्नी प्रणिता, भाऊ शैलश व राजेश यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनंत पांडे यांनी केले. आभार जितेंद्र सातपूते यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना, एकविध क्रीडा संघटना यांनी केले. यशस्वीतेसाठी राहुल ढोणे, सचिन भेंडे, एम.एन. मीर, अजय मिरकुटे, अभिजित पवार, नीलेश कुळसंगे, प्रितम शहाडे, अमोल जयसिंगपुरे, गणेश शिरसाठ आदींनी सहकार्य केले.

Web Title: 'Chit pat' sports reference book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.