चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:17 AM2018-01-09T00:17:11+5:302018-01-09T00:17:27+5:30

Chintamani Janmotsav Jayate Preparation | चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी

चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ जानेवारीपासून प्रारंभ : गणेश याग यज्ञासह अनेक धार्मिक विधी

आॅनलाईन लोकमत
कळंब : विदर्भाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री चिंतामणी जन्मोत्सव व गणेश याग यज्ञास १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. २३ जानेवारीपर्यंत चालणाºया या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री क्षेत्र कोटेश्वर येथे ‘पूजा व अभिषेक’ त्यांनतर कलश पूजन तिर्थस्थापना, ध्वजारोहण ‘श्रींची पूजा व अभिषेक’ आदी कार्यक्रम होणार आहे. १९ व २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुश्री अमरानंद भारती यांचे प्रवचन होणार आहे. २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गणेश जन्म, दुपारी ३ वाजता श्री गणेश जन्माचे किर्तन होणार आहे. २२ जानेवारी रोजी ११ ते ४ या वेळात महारूद्र हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता गायत्री परिवारातर्फे ‘विराट ज्ञान दिपयज्ञ’ आहे.
२३ जानेवारीला सकाळी काल्याचे किर्तन होणार आहे. दुपारी १ वाजता श्रीची द्वारयात्रा, मिरवणूक व सायंकाळी ५ वाजता दहिहांडी फोडल्या जाईल. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सत्यसाई सेवा समिती(उमरसरा) यांचेकडून श्री साई भजनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘भक्तीधारा’ हा संगीताचा कार्यक्रम आहे. २६ जानेवारी रोजी ‘मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्वाची धनी रणरागीणी-झाशीची राणी’ हा संगीतमय प्रबोधनात्मक एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २७ जानेवारी रोजी ‘नुपूर’ या शास्त्रीय नृत्यविष्कार सादर होणार आहे. २८ जानेवारी रोजी प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांचे ‘या जन्मावर....या जगण्यावर’ व्याखान, २९ जानेवारी रोजी ‘अस्सा वºहाडी माणूस’ दिवंगत कवी शंकरराव बढे यांच्या वऱ्हाडी गितांचे सादरीकरण होईल. ३० जानेवारी रोजी ‘स्वर गुरुकुंजाचे’ गुरुकुंज मोझरी येथील बालकलाकार सादर करणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ५ वाजता काकड आरती व हरिपाठ, श्रींला महाभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण १८ वा अध्याय, साग्रसंगीत नित्य आरती, प्रवचन, श्री गणेश पुराण वाचन, सामुहिक हरिपाठ, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी विनंती देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Chintamani Janmotsav Jayate Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.