नागपूरचे सीसीएफ टिपेश्वरमध्ये धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 10:07 PM2017-09-01T22:07:03+5:302017-09-01T22:07:25+5:30

वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन (नागपूर) यांनी टिपेश्वर अभयारण्यातील चंदन वृक्षतोड प्रकरणी विभागीय वन अधिकाºयांपासून तर वन परिक्षेत्राधिकारी व इतर कर्मचाºयांची.....

The CCF of Nagpur caught fire in Tippshwar | नागपूरचे सीसीएफ टिपेश्वरमध्ये धडकले

नागपूरचे सीसीएफ टिपेश्वरमध्ये धडकले

Next
ठळक मुद्देअभयारण्यातील चंदन वृक्षतोडीची दखल : वन्यजीवच्या अधिकाºयांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन (नागपूर) यांनी टिपेश्वर अभयारण्यातील चंदन वृक्षतोड प्रकरणी विभागीय वन अधिकाºयांपासून तर वन परिक्षेत्राधिकारी व इतर कर्मचाºयांची गुरूवारी चांगलीच झाडाझडती घेतली.
टिपेश्वर अभयारण्यातील पिलखान नर्सरी परिसरातील चंदन वृक्षतोड प्रकरणी मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन हे गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नागपूरवरून थेट टिपेश्वर अभयारण्यात गेले. तेथे रात्री मुक्काम करून त्यांनी शुक्रवारी सकाळी उपवनसंरक्षक भाऊराव राठोड, वनपरिक्षेत्राधिकारी अमर सिडाम व त्यांच्या पथकासह पिलखान नर्सरी व बीट नं.१०० परिसरातील इतर भागाची पाहणी केली. त्यानंतर विश्रामगृहावर सर्व अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेतली. अवैध सागवान वृक्ष ते चंदन वृक्षांच्या अवैध तोडीच्या वाढत्या प्रकरणांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अभयारण्याच्या आत जाण्यासाठी सुन्ना व माथनी या दोन ठिकाणी स्वतंत्र गेट आहेत. या दोन्ही गेटवर टिपेश्वरचे कर्मचारी दिवसरात्र दोन पाळीत तैनात असताना चंदन तस्कर आत घुसलेच कसे, त्यांनी आत अवजारे नेलीच कशी, याबाबत डीएफओंना जाब विचारला. या प्रकरणातील फरार आरोपी अद्यापही न मिळाल्याबाबत त्यांनी अधिकाºयांना चांगलेच खडसावले.
चंदनाची ५० झाडे तोडण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी यापेक्षा किती तरी अधिक झाडांची तोड करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. ही झाडे अनेक दिवसांपासून तोडल्या जात असल्याची बाब आता समोर येत आहे. वन्यजीव विभागाचे मुख्य कार्यालय हे नागपूरला असल्यामुळे नागपूरवरूनच टिपेश्वर अभयारण्याचा कारभार चालतो. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन यांनी टिपेश्वर अभयारण्याच्या कर्मचाºयांना अनेक महत्त्वाच्या सूचना यावेळी केल्या.
भेटीला १५ दिवस का ?
चंदन वृक्षतोड १५ आॅगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर वन्यजीव मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन तब्बल १५ दिवसांनी टिपेश्वर अभयारण्यात आल्याने त्यांच्याही कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
कारवाईचे काय ?
सीसीएफ रंजन यांनी विलंंबाने का होईना टिपेश्वरमध्ये भेट दिली. परंंतु कारवाईचे काय हा प्रश्न कायम आहे. चंदन तोडीत संगनमत असल्याचा संशय असल्याने सखोल चौकशी व कारवाई अपेक्षित आहे.
 

Web Title: The CCF of Nagpur caught fire in Tippshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.