बस उलटून १६ प्रवासी गंभीर

By admin | Published: December 23, 2014 11:11 PM2014-12-23T23:11:34+5:302014-12-23T23:11:34+5:30

धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग फ्री झाल्याने रस्त्याच्या बाजूला मोठ्या नालीत जाऊन बस कोसळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजारजवळ

Bus reversed 16 passengers serious | बस उलटून १६ प्रवासी गंभीर

बस उलटून १६ प्रवासी गंभीर

Next

अकोलाबाजार : ‘स्टेअरिंग फ्री’ने अपघात
अकोलाबाजार : धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग फ्री झाल्याने रस्त्याच्या बाजूला मोठ्या नालीत जाऊन बस कोसळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजारजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळ आगाराची बस क्र. एम.एच.४०-९८६५ अकोलाबाजारवरून यवतमाळकडे जात होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डाजवळ बसचे अचानक स्टेअरिंग फ्री झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण जाऊन बस रस्त्याच्या लगत असलेल्या मोठ्या नालीत जाऊन कोसळली. बस उलटल्याने प्रवासी एकमेकांच्या अंगावर आदळले. बसमधून आपल्या आईसोबत प्रवास करणारा दोन महिन्याचा अंश अनिल नैताम रा. कोळंबी या चिमुकल्याच्या अंगावर प्रवासी पुरुष आदळल्याने त्याला जबर मार लागला. तर इतर जखमींमध्ये भगवान पांडुरंग हनमंते, लक्ष्मी भगवान हनुमंते दोघे रा. सालोड, स्मिता प्रमोद देवतळे, प्रमोद रामदास देवतळे रा. डांगरगाव, माधव शंकर कांबळे रा.झुली, श्रावण विठोबा जोगी रा. पिंपरी, विलास माधव नान्ने, रेखा विलास नान्ने रा. मांजर्डा, सुनीता अनिल नैताम, सदाशिव सोमा नैताम रा. कोळंबी, भुवन गौतम मुनेश्वर, पूजा गौतम मुनेश्वर रा. पळसी, निखील दत्तात्रय ठोंबरे रा. अकोलाबाजार, महेश देवराव कदम रा. येवदा, दादूसिंग राठोड रा. साखरतांडा, पांडुरंग कराळे रा. अकोलाबाजार अशी जखमींची नावे आहे. या जखमींंना वाहक उत्तम कापसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश खांदवे यांनी जखमींवर उपचार केले. पैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यात पंचायत समिती सदस्य थावरु चव्हाण, चंद्रकांत नागलिया, पंडित खंडारे, भालचंद्र कलाने, शामराव हनवंते, राजू काटपेलवार, बंडू कोपलवाड यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसचे चालक प्रकाश शंकर राऊत यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने यावेळी लंपास केला. (वार्ताहर)

Web Title: Bus reversed 16 passengers serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.