अधिकारी ऐकत नाही, जनतेची कामे होत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:08 PM2018-01-20T23:08:55+5:302018-01-20T23:09:07+5:30

केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. परंतु या सत्तेचा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना कोणताही उपयोग होत नाही. कार्यकर्त्यांमार्फत जनतेची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, .....

The authorities do not listen, people do not get the job done | अधिकारी ऐकत नाही, जनतेची कामे होत नाहीत

अधिकारी ऐकत नाही, जनतेची कामे होत नाहीत

Next
ठळक मुद्देभाजपा कार्यकर्त्यांची व्यथा : मंत्र्यांकडून सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. परंतु या सत्तेचा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना कोणताही उपयोग होत नाही. कार्यकर्त्यांमार्फत जनतेची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, अशा शब्दात भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापुढे आपली व्यथा मांडली.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘युफोरिया-१८’ या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी ना. तावडे यवतमाळात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षाच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळातील सरकारची तीन ठळक कामे सांगा, अशी विचारणा ना. विनोद तावडे यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यावर कार्यकर्त्यांकडून ‘एकही नाही’ असे सरसकट उत्तर आले. या उत्तराने ते चक्रावले. त्यांनी पुन्हा हाच प्रश्न केला असता एका कार्यकर्त्याने ‘भाजपा सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात पक्ष कार्यकर्त्याचे कुठलेच काम झाले नाही, कार्यकर्ते पैदल केले’ एवढीच काय ती सरकारची उपलब्धी असल्याचा पाढा वाचला. त्यानंतर उपस्थितांपैकी एका पाठोपाठ कार्यकर्ते हाच सूर आळवताना दिसले. नगरपरिषदेच्या माजी शिक्षण सभापती, बांधकाम सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनीही आपल्या व्यथा मांडल्या. भाजपाच्या नगरसेविका म्हणाल्या, मी शिक्षण सभापती होते. मात्र प्रशासन स्तरावर काम होत नाही, अधिकारी आमचे ऐकत नाही, त्यावरून ना. तावडे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करा, त्यातून शासकीय अधिकाºयांवर दबाव निर्माण करा, असा सल्ला दिला. उपाध्यक्षांनी अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा रेटला. यावेळी उपस्थित शिक्षणाधिकाºयांनी संच मान्यतेची अडचण सांगितली. भाजपाचा सरचिटणीसांनी आत्ताच्या पेक्षा १९९५ चे युतीचे सरकार चांगले होते, असे सांगितले. कार्यकर्त्याला या सरकारमध्ये काहीच सोय नाही, कुणाच्याही हाताला काम नाही, कामे बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न या सरचिटणीसांनी विचारला. आर्णी येथील भाजपा तालुकाध्यक्ष बिपीन राठोड यांनी आपल्या शिक्षक भावाच्या प्रकरणाचे ना. तावडे यांना स्मरण करून देत संस्था चालक ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर शंभर कार्यकर्ते घेऊन जाऊन त्या संस्था चालकाला धडा शिकवा असा सल्ला तावडेंनी दिला. हाच धागा पकडून नगपरिषदेच्या माजी बांधकाम सभापतींनी मी अधिकाºयाला धडा शिकविला, मात्र मलाच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले. तरीही काम झाले नाही. काम होत असेल तर माझी पुन्हा धडा शिकविण्याची तयारी असल्याचे हा पदाधिकारी म्हणाला.
सरकारला तीन वर्षे होऊनही मंडळ, महामंडळ, जिल्हा, तालुका समित्यांवर नियुक्त्या झाल्या नाही. या सरकारमध्ये कार्यकर्त्यांसाठी काहीच नसल्याची भावना भाजपाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी एक सुरात बोलून दाखविली.
अभाविपचा घेराव
शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपा जिल्हाध्यक्षाच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्या घराजवळच अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडविला. यावेळी हातात फलके झळकवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ना. तावडे वाहनाबाहेर आले. त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन निवडणुका आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.

Web Title: The authorities do not listen, people do not get the job done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.