हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:26 PM2018-05-19T23:26:28+5:302018-05-19T23:26:28+5:30

गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे.

Attempted accused in the case of deer hunting | हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत

हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत

Next
ठळक मुद्देदीड वर्षे लोटली : अद्याप दोन आरोपी फरारच, वन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे.
मराठवाड्यातील निवघा शिवारात १२ जुलै २०१६ रोजी उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथील वसंता भीमराव राठोड, गजानन यशवंत जाधव, दिनेश अशोक जाधव, दिलीप गणपत जाधव व संजय गणपत जाधव यांनी दोन हरिणांची शिकार केली. तेथून दुचाकीवर मांस आणत असताना वन चौकीतील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी पाचपैकी चार जणांनी पळ काढला. पोलिसांनी दिनेश जाधव याला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले होते. मात्र वन विभागाला गुंगारा देऊन तोसुद्धा फरार झाला होता.
या प्रकरणात कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत दोन वनरक्षक व एका वनमजुराला निलंबित करण्यात आले होते. वनविभागात बहुचर्चित या प्रकरणातील आरोपी मात्र फरार होते. वन विभागात त्यांच्या मागावर होता. यापैकी वसंता राठोड हा शहरात येत असल्याच्या माहितीवरून ९ मे रोजी त्याला अटक केली. त्यानंतर गजानन जाधव याला दिंडाळा येथून तर दिनेश जाधवला आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील पेंडलवाडा येथून अटक करण्यात आली. वनक्षेत्रपाल रत्नपारखी यांच्या फिरत्या या दोघांना अटक केली. अद्याप दिलीप जाधव व संजय जाधव हे दोन आरोपी फरार आहे.
उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल मळघणे, वनपाल प्रिया पोटेकर, वनरक्षक एम.ए.पठाण, एन.पी.गाजुलवार यांनी ही कारवाई पार पाडली. आता दोन आरोपींना अटक करण्याचे आव्हान आहे.

Web Title: Attempted accused in the case of deer hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा