१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:19 PM2018-06-30T22:19:14+5:302018-06-30T22:19:56+5:30

येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Approval of 12 crores proposals | १२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : स्थायी समितीची सभा, घनकचऱ्यासाठी ६२ मिनी ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ नगर परिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. त्याकरिता नगरपरिषदेने डीपीआर तयार केला. त्याला मंजुरी देण्यासाठी सभागृहाचा ठराव आवश्यक होता. शनिवारी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. यात घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार आहे. या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. वाहन खरेदीसाठी चार कोटी ८९ लाखांचा निधी आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र निविदा कमी दराची असल्याने निधी शिल्लक राहणार आहे. या शिल्लक निधीतून पुन्हा २२ जादा वाहने खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली. त्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या ८४ वाहनांसाठी ८४ चालक आणि ८४ मदतनिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एक कोटी ९५ लाख रूपये लागणार आहेत. घनकचऱ्यापासून खत निर्मितीसाठी एक कोटी ९२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पथदिव्यांसाठी वापरली जाणारी वीज वाचविण्यासाठी आता एलईडी लाईटचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. सभागृह अद्ययावत करणे, दोन नवीन फॉगिंग मशीन खरेदी करणे, डीडीटी औषधाची फवारणी करणे, आदी प्रस्तावांनाही मंजुरी बहाल करण्यात आली. सभेत १२ कोटी २७ लाख ९२ हजार ९७७ रूपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
शहरात अद्याप समाधानकारक पाऊस बरसला नाही. त्यामुळे काही भागात पाण्याचा प्रश्न कायम आहे. ही पाणीटंचाई निवारण्यासाठी अत्यावशक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. इतर ठिकाणचे टँकर बंद करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
तारांगण निविदा १८ टक्के जादा दराने
नाविन्यपूर्ण योजनेतून नेहरु उद्यान परिसरात तारांगणाची वास्तू उभारली जाणार आहे. त्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. तिनदा निविदा काढूनही एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. अखेर चौथ्यांदा निविदा काढल्यानंतर गणेश ईनोव्हेशन, राजेंद्र टेकाडे आणि कमर अली यांच्या निविदा प्राप्त झाल्या. यापैकी राजेंद्र टेकाडे व कमर अली या कंत्राटदारांनी निविदेतील शर्ती व अटी पूर्ण न केल्याने त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. गणेश इनोव्हेशन यांची निविदा १८ टक्के दराने जास्त होती. ही निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली. तिला सभेने मंजुरी बहाल केली.

Web Title: Approval of 12 crores proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.