‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:24 PM2017-10-29T22:24:13+5:302017-10-29T22:24:29+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास यवतमाळकरांना रविवारपासून साध्य झाला.

Amravati's first schedule for 'Shivshahi' | ‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती

‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास यवतमाळकरांना रविवारपासून साध्य झाला. यवतमाळ आगारातून सकाळी १० वाजता शिवशाही बसच्या यवतमाळ-अमरावती या पहिल्या फेरीचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते फीत कापून झाला. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सध्या यवतमाळला तीन शिवशाही बसेस प्राप्त झाल्या. यातील दोन बस यवतमाळ-पुणे मार्गावर तर, एक बस पुसद-औरंगाबाद मार्गावर धावणार आहे. आणखी तीन बसेस लवकरच प्राप्त होणार आहे. या बसेसही लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकाºयांनी यावेळी दिली. पहिल्या फेरीवर चालक रमेश राठोड होते, तर वाहक मेश्राम होत्या.
प्रवाशांनी आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीसह इतर बससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी ना. राठोड यांनी केले. याप्रसंगी विभाग नियंत्रक अशोक वरठे, विभागीय वाहतूक अधिकारी मुक्तेश्वर जोशी, आगार व्यवस्थापक सचिन डफडे, यंत्र अभियंता अविनाश राजगुरे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगोले, शिवसेना पदाधिकारी, एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.

Web Title: Amravati's first schedule for 'Shivshahi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.