Next

पळसखेड धरणातील झाडांवर अडकली आठ माकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 03:07 PM2019-08-03T15:07:47+5:302019-08-03T15:07:54+5:30

वाशिम जिल्ह्यात गेल्या ९ दिवसांपासून पाऊस सुरू आहे

वाशिम जिल्ह्यात गेल्या ९ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यादरम्यान शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही माकडे रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील धरणामध्ये असलेल्या झाडावर चढली; मात्र बराच वेळ झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ८ माकडे सुमारे २० तास झाडावरच अडकली.