Next

वाईन म्हणजे दारु का? याविषयी तुमचं मत काय? Wine in Supermarket | Difference Between Alcohol And Wine

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:57 PM2022-01-31T14:57:16+5:302022-01-31T14:57:56+5:30

दारु आणि वाईन यात फरक काय ? वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. वाईनप्रेमी, उत्पादक हे वाईनला दारू म्हणण्याच्या एकदम विरोधात आहेत. असं असलं तरी राज्य सरकारच्या कायद्यानुसार मात्र वाईन हे अल्कोहोलिक पेय आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये वाईन क्लब आहेत. त्यात अनेक वाईनप्रेमी सदस्य आहेत आणि या क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वाईनला दारू म्हणण्यास तीव्र विरोध केलाय. सर्वच प्रकारच्या अल्कोहोलिक पेयांना आपल्याकडील सामान्य नागरिक दारू असे म्हणतात. राज्य सरकारच्या बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट १९४९ च्या अंतर्गत अल्कोहोलिक पेय म्हणून ज्या पेयांचा उल्लेख केलेला आहे त्यात ब्रीझर, बीअर, वाईन आणि इंडिया मेड फॉरेन लिकर, कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा समावेश होतो. पण यातील आयएमएफएल पेय आणि देशी दारू हे दारू या प्रकारात मोडतात, असे वाईनप्रेमींचे म्हणणे आहे...