Next

आर्यन जेलमध्ये होता तेव्हा राहुल गांधींनी शाहरुखला पत्र लिहिलं? Rahul Gandhi letter to Shahrukh Khan

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:40 PM2021-11-04T14:40:05+5:302021-11-04T14:40:37+5:30

बॉलिवूडच्या बादशहा शाहरुख खान सध्या कठीण काळातून जातोय.. आर्यनच्या सुटकेने त्याला आता कुठे दिलासा मिळालाय... आर्यनच्या अटकेनं बॉलिवूड हादरलं... तर दुसरीकडे केंद्र सरकार बॉलिवूडमध्ये दहशत परवत असल्याचेही आरोप झाले... तसंच नवाब मलिकांनी तर भाजप शाहरुख खानशी बदला घेण्यासाठी आर्यनला अटक करत असल्याचाही सनसनाटी आरोप केला होता.. या सगळ्यात आता सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर येतेय, ती लक्ष वेधणारी आहे.. सूत्रांच्या हवाल्याने कळतंय, की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खान याला पत्र लिहिलं होतं.. मुख्य म्हणजे जेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा जेलमध्ये होता.. तेव्हा राहुल गांधींनी शाहरुखला हे पत्र लिहिलं होतं...