Next

बजेटमधून मुंबईला काय मिळालं,BJP खासदारांनाची बोलतीच बंद | Budget 2022 | BJP Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:37 PM2022-02-03T15:37:07+5:302022-02-03T15:37:27+5:30

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाजूनं ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. सत्ताधारी अर्थसंकल्पाची भलामण करतात, बजेटनं काय काय दिलं सांगतात आणि विरोधक काहीच मिळालं नाही, तोंडाला पानं पुसली म्हणत तुटून पडतात. पण आताच्या अर्थसंकल्पानं नेमकं काय दिलं हे सत्ताधाऱ्यांनाच सांगता येत नाहीये. विशेषत मुंबईच्या भाजप खासदारांना मुंबई आणि महाराष्ट्रासाठी बजेटमधून नेमकं काय मिळालं हेच सांगता येत नाहीये. भाजप खासदारांची बोलती बंद का झालीय, त्यांनाच बजेटमधून काय मिळालं हे सांगता का येत नाहीये यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात मुंबईतल्या भाजप खासदारांच्या प्रतिक्रिया. तर मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत. तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे राज्यसभेचे खासदार आहेत. यापैकी एकानंही मुंबई किंवा मुंबई महानगर क्षेत्रात बजेटनं काय दिलं याबद्दल एकही पोस्ट केलेली नाही किंवा प्रतिक्रियाही दिलेली नाही.