अवैध जुगार अड्डयावर धाड; पाच आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:32 PM2018-08-04T15:32:15+5:302018-08-04T15:32:45+5:30

वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ आॅगस्टच्या सायंकाळी शिरपूर येथे सुरू असलेल्या वरली मटका व जुगार अड्डयावर धाड टाकली.

 Yield on illegal gambling land; Five accused jerband | अवैध जुगार अड्डयावर धाड; पाच आरोपी जेरबंद 

अवैध जुगार अड्डयावर धाड; पाच आरोपी जेरबंद 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ आॅगस्टच्या सायंकाळी शिरपूर येथे सुरू असलेल्या वरली मटका व जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी १९ हजार २७० रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, शिरपूर येथील हनुमान मंदिरानजिक सुरू असलेल्या वरली-मटका व जुगार अड्डयावर विजय अंभोरे याच्यासह हबीबखाँ हुसेनखाँ, संतोष दामोदर बहिरे, रामभाऊ निवृत्ती टाले, लक्ष्मण काळूराम वैरागड आणि अब्दुल वहिब अब्दुल रऊफ हे पाच जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार २७० रुपयांच्या रोख रकमेसह १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, नमूद सहाही आरोपींविरूद्ध पोलिसांनी कलम १२ जुगार अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. त्यातील विजय अंभोरे हा फरार झाला असून अन्य पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत  पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, अजयकुमार वाढवे, कैलास इंगळे, भगवान गावंडे, प्रेम राठोड, बालाजी बर्वे, किशोर खंडारे, आश्वीन जाधव आदिंनी सहभाग घेतला.

Web Title:  Yield on illegal gambling land; Five accused jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.