सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:10 PM2019-02-02T18:10:21+5:302019-02-02T18:10:40+5:30

बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

The work of 'Ring Road' is still pending despite the survey being done for ten months! | सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित!

सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्याबाहेरून होणाºया जडवाहतूकीने शहरांतर्गंत वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून रिंग रोडचे काम प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार, मार्च २०१८ या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर कामाचे सर्वेक्षणही झाले. त्यानंतरचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले. मात्र, सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम अद्याप पुढे सरकू शकले नाही.
बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मार्च २०१८ ते जुलै २०१८ या कालावधीत झालेल्या रोडच्या सर्वेक्षणावर १४ लाख ६० हजार ५९७ रुपयांचा खर्च देखील झाला. याअंतर्गत रिसोड रोडनजिकच्या झाकलवाडीपासून काटा-कोंडाळा रोड, जागमाथा, सुरकंडी शिवार, पंचाळा शिवार, हिंगोली रोडवरील अनंत सहकारी सुतगिरणीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात ‘रिंग रोड’मुळे बाधीत होणारी घरे, शेती यासह अतिक्रमण आदी स्वरूपातील माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळविली. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष कामास अद्यापपर्यंत सुरूवात झालेली नाही. त्यामुळे ज्या मूळ उद्देशाने ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आला, तो सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे.
 
शहरांतर्गत वाहतूक विस्कळित; अपघातही अनियंत्रित!
वाशिमला अद्यापपर्यंत वळणमार्ग तयार झाला नसल्याने अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली नांदेड आदी जिल्ह्यांमधून वाशिममध्ये येणारी वाहने शहरातील हिंगोली नाका, पुसद नाका, पोष्टआॅफीस चौक, अकोला नाका आदी ठिकाणे ओलांडूनच समोर जातात. विशेष गंभीर बाब म्हणजे शहरांतर्गत वाहतूकही याच मुख्य मार्गावरून होते. यामुळे विस्कळितपणा वाढण्यासोबतच छोटे-मोठे अपघातही नियंत्रणाबाहेर गेले आहेत. यावर प्रभावी पर्याय म्हणून ‘रिंग रोड’चे काम विनाविलंब मार्गी लावणे आवश्यक ठरत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ‘रिंग रोड’च्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. ती विहित मुदतीत पार पाडण्यात आली. पुढचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करायचे आहे. 
- राजेंद्र लुंगे
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

Web Title: The work of 'Ring Road' is still pending despite the survey being done for ten months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम