वाशिम जिल्हा परिषदेला २१ वर्षात लाभले २२ कृषी विकास अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:49 PM2019-03-03T15:49:41+5:302019-03-03T15:50:21+5:30

वाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. 

Wasim Zilla Parishad get 22 Agriculture Development Officer in 21 years | वाशिम जिल्हा परिषदेला २१ वर्षात लाभले २२ कृषी विकास अधिकारी!

वाशिम जिल्हा परिषदेला २१ वर्षात लाभले २२ कृषी विकास अधिकारी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. 
जिल्हा परिषदेच्या कृषीविषयक योजना पात्र शेतकºयांपर्यंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, खतांचे नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकºयांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे.  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारी यांची नेमणुक शासनातर्फे केली जाते. अकोला जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिमची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली. तेव्हापासून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा वाशिममध्ये स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. प्रथम कृषी विकास अधिकारी म्हणून डी.के. पांडे यांनी सेवा दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेला नियमित व पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी कमी लाभले. २१ वर्षात तब्बल २२ कृषी विकास अधिकारी वाशिमला लाभले आहेत. यामध्ये डि.के.पांडे, एम.ए.शेख (तीन वेळा), प्रकाश लोखंडे (पाच वेळा), अ.म.इंगळे,  एस.एम. सोळुंके,  डी.डी. इंगळे, एन.व्ही.देशमुख (दोन वेळा), पी.के.खंडारे, अनिल बोंडे, पी.एस.शेळके, चंद्रकांत सुर्यवंशी, अभिजित देवगिरकर, नरेंद्र बारापत्रे, अवचार, पी.एस. शेळके यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये चंद्रकांत सुर्यवंशी यांची बदली झाल्यानंतर कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी.कुळकर्णी रूजू होणार होते. मात्र, ते रूजू झाले नसल्याने अभिजित देवगिरकर यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर देवगिरकर यांची वाशिम तालुका कृषी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर मोहिम अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांच्याकडे प्रभार सोपविला. बारापत्रे यांच्यानंतर अवचार आणि आता पी.एस. शेळके यांच्याकडे कृषी विकास अधिकारी पदाचा प्रभार सोपविलेला आहे. १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली तर सहा कृषी विकास अधिकारी नियमित लाभले. यामध्ये डी.के.पांडे, अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, एन.व्ही. देशमुख दोन वेळा आणि चंद्रकांत सुर्यवंशी असे सहा नियमित अधिकाºयांचा समावेश आहे.

Web Title: Wasim Zilla Parishad get 22 Agriculture Development Officer in 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.