वाशिम: ‘नायलॉन’ मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्याला दिले  जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:43 PM2018-01-24T17:43:17+5:302018-01-24T17:45:38+5:30

Washim: life given to the injured bird by 'Nylon' |  वाशिम: ‘नायलॉन’ मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्याला दिले  जीवदान

 वाशिम: ‘नायलॉन’ मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्याला दिले  जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्देसावली प्रतिष्ठान वत्सगुल्म व वाईल्ड रेस्क्यु या निसर्ग व्यासंगी गृपने मकर संक्रातीच्या अगोदरपासूनच संपूर्ण शहरात बर्ड रेस्क्यु अभियान राबविले. चेतन राठोड यांनी मांजामुळे जखमी झालेला पक्षी पाहून सावली प्रतिष्ठानच्या बर्ड रीस्क्यु टीमला संपर्क साधला. मांजामुळे मानेला व चोचेला जखम झालेल्या पक्ष्यावर उपचार करून पंखामध्ये अडकलेला सूक्ष्म मांजा काढण्यात आला.


वाशिम: येथील सावली प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेनेने नायलॉन मांजाने मानेला व चोचेला जखम झालेल्या पारवा या पक्षावर उपचार करून जीवदान दिले. दरम्यान, मकर संक्रातीच्या पृष्ठभूमीवर पतंगबाजीसाठी बंदी असूनही  वापरात येत असलेला मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो, ही बाब गांभीर्याने घेत सावली प्रतिष्ठान वत्सगुल्म व वाईल्ड रेस्क्यु या निसर्ग व्यासंगी गृपने मकर संक्रातीच्या अगोदरपासूनच संपूर्ण शहरात बर्ड रेस्क्यु अभियान राबविले. 
मांजामुळे मुक्या पक्षांचा जीव जाऊ नये म्हणून मांजा न वापरणयासाठी जनजागृती करण्यासोबतच मांजामुळे  जखमी झालेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी शोध मोहीम (सर्च आॅपरेशन) राबविण्यात येत आहे. यामध्ये जास्त झाडे असलेल्या परिसरात विशेष लक्ष देण्यात आले. त्यासंदर्भात सामाजिक संकेतस्थळावरुनही जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुषंगाने चेतन राठोड यांनी मांजामुळे जखमी झालेला पक्षी पाहून सावली प्रतिष्ठानच्या बर्ड रीस्क्यु टीमला संपर्क साधला. पारवा पक्ष्याची सुटका करण्यासाठी टीम सावली प्रथोमोपचाराचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाली. नायलॉन मांजामुळे मानेला व चोचेला जखम झालेल्या पक्ष्यावर उपचार करून पंखामध्ये अडकलेला सूक्ष्म मांजा काढण्यात आला. त्यांच्या या सामाजिक कार्याप्रती सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: Washim: life given to the injured bird by 'Nylon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम