वाशिम : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या; अन्यथा आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:16 PM2017-12-14T14:16:14+5:302017-12-14T14:22:43+5:30

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, २०१५-१६ पासून आजतागायत शिष्यवृत्ती तसेच ‘फ्री-शीप’ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.यामुळे गोरगरिब कुटूंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Washim: Give scholarships to students; Otherwise the movement! | वाशिम : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या; अन्यथा आंदोलन!

वाशिम : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या; अन्यथा आंदोलन!

Next
ठळक मुद्दे‘व्हीबीव्हीपी’चा इशारा: जिल्हाधिका-यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, २०१५-१६ पासून आजतागायत शिष्यवृत्ती तसेच ‘फ्री-शीप’ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.यामुळे गोरगरिब कुटूंबातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि, प्रलंबित शिष्यवृत्ती विनाविलंब देण्याची व्यवस्था करा; अन्यथा २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असा  इशारा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत राज्यशासनाकडे पाठविलेल्या निवेदनात ‘व्हीबीव्हीपी’ने नमूद केले आहे, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाºया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून दरवर्षी ठराविक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे शिक्षणाचा किमान खर्च भागविणे संंबंधित प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना शक्य होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास ‘ब्रेक’ लावल्याने शिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. ही बाब लक्षात घेवून प्रलंबित शिष्यवृत्ती विनाविलंब देण्यात यावी; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा ‘व्हीबीव्हीपी’ने दिला आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी,तालुका सचिव रवि मोपकर, आकाश शिंदे, अजय वानखेडे,भागवत शिंदे, नितेश मोपकर, अमोल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Washim: Give scholarships to students; Otherwise the movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम