Washim: fire at pimpalgaon | वाशिम: पिंपळगाव येथील आगीत २.७८ लाखाचे साहित्य खाक !

ठळक मुद्देविद्युत रोहित्रात शॉर्ट सर्किट झाल्याने शेतातील गोठा व अन्य ऐवजाला आग लागली.ही घटना १ जानेवारीला रात्री घडली.


वाशिम - शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथील शोभा मधुकर दंडे यांच्या शेतातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना १ जानेवारीला रात्री घडली असून, २ जानेवारीला तलाठ्यांनी तलाठ्यांनी पंचनामा करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. 
पिंपळगाव येथील शोभा दंडे यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत जोडणी घेतलेली आहे. बाजूचे शेत साहेबराव दंडे यांचे असून, या शेतात विद्युत रोहित्र आहे. विद्युत रोहित्रात शॉर्ट सर्किट झाल्याने शेतातील गोठा व अन्य ऐवजाला आग लागली. यामध्ये विद्युत मीटर, स्टार्टर, संत्रा पिकाला लावण्यासाठी आणलेले बांबूचे २९०० नग, गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, स्प्रिंकलर तोट्या, पेरणी यंत्र, पीव्हीसी पाईप आदी दोन लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. यासंदर्भात तलाठी व्ही.जी. राठोड यांनी पंचनामा केला असून, नुकसानाचा अहवाल तहसिदारांकडे सादर केला. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शोभा दंडे यांनी मंगळवारी केली.