राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:40 PM2018-02-28T15:40:52+5:302018-02-28T15:40:52+5:30

वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Various events on the occasion of National Women's Day | राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

Next
ठळक मुद्देरांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रस्सीखेच, बॅडमिंटन, खो-खो ,गोळाफेक, लांबउडी, कबड्डी व धावणे स्पर्धा होणार आहे. याशिवाय ‘बेटी बचाव व बेटी पढाव’ आणि महिला मतदार जनजागृती लोगो तयार करण्याचीही स्पर्धा ठेवण्यात आली आहे.. ८ मार्च रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाशिममधून रॅली काढण्यात येईल.


वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रस्सीखेच, बॅडमिंटन, खो-खो ,गोळाफेक, लांबउडी, कबड्डी व धावणे स्पर्धा होणार आहे. याशिवाय ‘बेटी बचाव व बेटी पढाव’ आणि महिला मतदार जनजागृती लोगो तयार करण्याचीही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. रांगोळी स्पर्धा शाळा व महाविद्यालयाच्या वेळेनुसार ६ मार्च रोजी घेण्यात येईल. चित्रकला स्पर्धा ७ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात होईल; तर मैदानी स्पर्धा ७ मार्च रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे होतील. ८ मार्च रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाशिममधून रॅली काढण्यात येईल. यादिवशी पोलिस कवायत मैदानावर ‘बेटी बचाव बेटी पढाव’ आणि ‘महिला मतदार जनजागृती लोगो’ ही स्पर्धा सकाळी ७ वाजतापासून घेतली जाणार आहे. विविध स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बक्षीसांचे वितरण केले जाईल, असे कळविण्यात आले आहे. 

Web Title: Various events on the occasion of National Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.