भीषण अपघातात दोन चिमुकले भाऊ जागीच ठार, आई-वडिल गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:54 PM2018-08-09T16:54:30+5:302018-08-09T19:08:34+5:30

मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील पॉवरहॉऊसजवळ कारने मोटरसायकला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील 2 भाऊ जागीच ठार झाले आहेत. तर

Two dead, two brothers were dead on the spot and mother and father serious injured | भीषण अपघातात दोन चिमुकले भाऊ जागीच ठार, आई-वडिल गंभीर जखमी

भीषण अपघातात दोन चिमुकले भाऊ जागीच ठार, आई-वडिल गंभीर जखमी

Next

मानोरा (वाशिम) : मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील पॉवरहॉऊसजवळ कारने मोटरसायकला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील 2 भाऊ जागीच ठार झाले आहेत. तर आई वडिल गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

वाईगौळ येथील शंकर पंजाब सोंगे (वय 33), शितल शंकर सोंगे (24),  मुलगा हरिओम शंकर सोंगे (6) सोम शंकर सोंगे (3) हे एम.एच.29 क्यु. 1669 या मोटरसायकलने दिग्रसला येत होते. दिग्रसवरून मानोराकङे जाणारी एम.एच. 39 एल 9200 ही कार भरधाव वेगाने येत होती. या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटरसायकलला जोरची धडक देऊन त्यात हरीओम व सोम हे दोन भाऊ जागीच ठार झाले. तर मृत्यू पडलेल्यांची आई शितल व वडिल शंकर गंभीर हेही गंभीर जखमी आहेत. या आई-वडिलांना दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला पाठविण्यात आले. दरम्यान, कारचालक अपघात होताच घटनास्थळावरुन फरार झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले करीत आहे.

Web Title: Two dead, two brothers were dead on the spot and mother and father serious injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.