शेलुबाजार चौकीला पोलीस अधीक्षकांची अचानक भेट

By admin | Published: July 4, 2015 12:09 AM2015-07-04T00:09:46+5:302015-07-04T00:09:46+5:30

बेशिस्त वाहतुक व्यवस्थेवर नाराजी.

A surprise visit to the Salubazar Chowki to the Superintendent of Police | शेलुबाजार चौकीला पोलीस अधीक्षकांची अचानक भेट

शेलुबाजार चौकीला पोलीस अधीक्षकांची अचानक भेट

Next

मंगरुळपीर (जि. वाशिम ): तालुक्यातील शेलुबाजार येथे ३ जुलै रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अचानक दिलेल्या भेटीने चांगलीच खळबळ उडाली. नेहमी गजबजलेल्या शेलुबाजार चौकात आल्याबरोबर तेथे आढळून आलेल्या बेशिस्त वाहतुकीबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी शेलुबाजार पोलीस चौकीला अचानक भेट दिली असता तेथे तीन कर्मचारी उपस्थित होते. थोडयावेळ तेथे थांबून कामकाजाची माहिती घेवून त्यांनी शेलुबाजार चौकात भेट दिली असता संपूर्ण चौक अतिक्रमकांनी वेढलेला व बेशिस्त वाहतुक आढळून आली. खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सर्वांच्या भेटी घेवून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सर्वांना सूचना दिल्यात. त्यानंतर उपस्थित कर्मचार्‍यांना सूचना देवून नियमांचे भंग केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.  

Web Title: A surprise visit to the Salubazar Chowki to the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.