वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 07:54 PM2017-11-13T19:54:56+5:302017-11-13T19:56:00+5:30

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. 

Students of 183 schools in Washim district have tested themselves! | वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली चाचणी !

वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली चाचणी !

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी विद्यार्थ्यांची प्रगती तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. 
इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात आली. शाळेतील शिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी किती ‘लर्निंग आऊट कम’ (अध्ययन निष्पत्ती) प्राप्त केले आहे, यासाठी प्रत्येक जिल्हयातील काही निवडक शाळांतील विद्यार्थांची पडताळणी या चाचणीच्या आधारे आता केली जाणार आहे. देशभरातील सर्व निवडक शाळांमध्ये १३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळांचा समावेश होता, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली. हे एकप्रकारे सर्वेक्षण असून, तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बहुपर्यायी प्रश्नपद्धतीने ही चाचणी घेण्यात आली. तिसरी व पाचवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न होते तर आठवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित ६० गुणांसाठी ६० प्रश्न होते.  परीक्षा संपल्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन त्याच दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा कक्षात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती डॉ. नागरे यांनी दिली.

Web Title: Students of 183 schools in Washim district have tested themselves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.