शिरपुरात संत सावता माळीचा जयघोष; भाविकांना महाप्रसादाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:34 PM2018-08-10T12:34:06+5:302018-08-10T12:35:47+5:30

शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला.

sant sawata porcession at Shirpur; Distribution of Mahaprashad | शिरपुरात संत सावता माळीचा जयघोष; भाविकांना महाप्रसादाचे वितरण

शिरपुरात संत सावता माळीचा जयघोष; भाविकांना महाप्रसादाचे वितरण

googlenewsNext
ठळक मुद्देशिरपूर जैन येथे संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या शोभायात्रेत विविध वेषभुषा धारण केलेले युवक लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. या शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर जैन येथे संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संत सावतामाळी मंदिरावर सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुण्यतिथी सोहळ्याच्या मुख्य दिवशी १० आॅगस्ट रोजी परिसरातील भजनी मंडळे व हजारो भाविकांच्या सहभागाने संत सावता माळी यांच्या पालखीची शोभायात्रा गावातून फिरविण्यात आली. या शोभायात्रेत विविध वेषभुषा धारण केलेले युवक लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. संपूर्ण गावात ही शोभायात्रा फिरविल्यानंतर दुपारी ३ वाजता संत सावता माळी संस्थानच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी ११ क्विंटल गव्हाच्या पोळ्या, १० क्विंटल काशीफळाची भाजी, १.५० क्विंटल रव्याचा शिरा आणि २ क्विंटल भात बनविण्यात आला होता. 

श्वेतांबर जैन संस्थानकडून भाविकांना अल्पोपहार
संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांची सेवा म्हणून श्वेतांबर जैन संस्थानच्यावतीने ठिकठिकाणी चहापान आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. शेकडो स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना अल्पोपहार व चहापान पुरवित होते. 

माळी बांधवांची दुचाकी रॅली
संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पालखी शोभायात्रा काढण्यापूर्वी माळी समाजबांधवांनी गावातून दुचाकी रॅली काढली. यात शेकडो माळी समाज बांधव सहभागी झाले होते. या दुचाकी रॅलीत हाती झेंडे घेऊन सहभागी झालेले युवक संत सावता माळी यांच्या नावाचा जयघोष करीत होते.

Web Title: sant sawata porcession at Shirpur; Distribution of Mahaprashad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.