ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 07:29 PM2017-08-16T19:29:43+5:302017-08-16T19:32:51+5:30

कारंजा लाड: सातव्या वेतन मंडळाचा अहवाल केंद्रीय कर्मचा-यांना लागू होऊन १ वर्षाचा काळ लोटला तरी जीडीएस कमिटीचा अहवाल लागू करण्यात आला नाही. हा अहवाल लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सदस्य १६ आॅगस्ट पासून ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत.

Rural Postal Service Injured Stampede | ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर 

ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर 

Next
ठळक मुद्देकमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यातग्रामिण डाक सेवकांना ८ तासाचे काम देऊन खात्यात सामाविष्ट करावेपेन्शन सुविधा लागू करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: सातव्या वेतन मंडळाचा अहवाल केंद्रीय कर्मचा-यांना लागू होऊन १ वर्षाचा काळ लोटला तरी जीडीएस कमिटीचा अहवाल लागू करण्यात आला नाही. हा अहवाल लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सदस्य १६ आॅगस्ट पासून ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यीवतीने कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी संघटनेने सुचविलेल्या बदलानुसार लागू कराव्यात. ग्रामिण डाक सेवकांना ८ तासाचे काम देऊन खात्यात सामाविष्ट करावे, ग्रामीण डाक सेवकांना कॅट दिल्ली आणि मद्रास न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन सुविधा लागू करावी. ग्रामिण डाक सेवकांचा टारगेट नावाखाली चालवलेला छळ थांबविण्यात यावा आदि विविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी १६ आॅगस्ट पासून वाशिम जिल्ह्यातील पूर्ण ग्रामीण डाक सेवक आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याचे  ग्रामीण डाक सेवक संघटनेचे कारंजा तालुका सचिव आर.डी. जागंडे, भिमराव आठवले, रामहरी चौधरी, केशवराव पेचगाडे, प्रभाकर बानगांवकर, संजय भुयटे, संतोष ताथोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे. डाकसेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाग विभागातील व्यवहार खोळबंळा आहे.

Web Title: Rural Postal Service Injured Stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.