रिसोड नगर परिषदेवर संतप्त नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:39 AM2018-02-08T01:39:35+5:302018-02-08T01:40:00+5:30

रिसोड : स्थानिक गैबीपुरा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला.

Riot Nagar Parishad's angry citizens' front | रिसोड नगर परिषदेवर संतप्त नागरिकांचा मोर्चा

रिसोड नगर परिषदेवर संतप्त नागरिकांचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : स्थानिक गैबीपुरा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला.
प्रभाग क्रमांक एकमध्ये येत असलेल्या गैबीपुरा परिसरात गत २0 वर्षांपासून कोणतेही रस्ते व नाल्या न झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. रिसोड नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याचे पाहून नागरिकांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. रस्ते व नाल्याची कामे अस्तित्वात आहेत. विद्युत खांब तसेच पथदिवे लावण्यात यावे, वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासंदर्भात तहसीलदार राजू सुरडकर तसेच नगर परिषदेच्या कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर, निवासी उपजिल्हा प्रमुख भागवत गवळी, मुनाभाई, बबलू खरात,  सुनील कोळपे, बबलू अली अस्मत अली, सोमनाथ फुलउंबरकर, बबलू यादव, रितेश गोखले, शेख तत्वीर, रवी दळवी, संतोष राऊत, सचिन मुसळे, पवन बाजड, मोसीम अली, अस्मत अली, विष्णू भोपळे, स्नेहल देबाजे, मोहन खरात, गजानन पातळे, दादाराव वाळके, पडघान, विकी पंडित, सागर इरतकर, अशोक राजुरकर, बबन राजुरकर, मदन राजुरकर, संतोष राजुरकर, राहुल काळे, शेख नसीम शेख इसुफ,  वच्छला कांबळे, सीता कोळपे, पार्वती राजुरकर,  सुमीत्रा राऊत, चंद्रकला साबू, नंदा जुमडे, रंजना नाईकवाडे, करुणा देशमुख, कमला मुसळे, शुभम सरनाईक, शकील शेख, शमाबी शेख मुनाफ, सदाबी शेख आयुफ यांच्यासह महिला व पुरुषांची उपस्थिती होती.

Web Title: Riot Nagar Parishad's angry citizens' front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.