वृद्ध आईच्या पालनपोषणास मुलांचा नकार; हेल्पलाइनच्या दणक्याने लगेच होकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:34 AM2023-01-25T08:34:38+5:302023-01-25T08:35:00+5:30

आईचे पालन पाेषणही करण्यास त्यांनी नकार दिला.

Refusal of children to care for elderly mother A quick nod to the helpline | वृद्ध आईच्या पालनपोषणास मुलांचा नकार; हेल्पलाइनच्या दणक्याने लगेच होकार!

वृद्ध आईच्या पालनपोषणास मुलांचा नकार; हेल्पलाइनच्या दणक्याने लगेच होकार!

googlenewsNext

वाशिम :

कोरोनामुळे वडिलांचे निधन झाले. ७२ वर्षीय आईची जगण्याची धडपड सुरू असतानाच  मुलांनी आईला विश्वासात न घेता वडिलांची शेती स्वत:च्या नावावर करून घेतली. आईचे पालन पाेषणही करण्यास त्यांनी नकार दिला.  ‘१४५६७’ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाइनवर वृद्धेने फाेन करून अन्यायाचा पाढा वाचला. अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात वृद्ध आईला न्याय मिळाला. 

झाकलवाडी येथील ७२ वर्षीय वृद्ध आईने हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. कोरोनामुळे पतीचे निधन झाले आणि तिन्ही मुलांनी शेती स्वत:च्या नावावर करीत पालनपोषण करण्यास नकार दिल्याची व्यथा या त्यांनी हेल्पलाइनवर व्यक्त केली. हेल्पलाइनचे क्षेत्रीय प्रतिसाद अधिकारी ज्ञानेश्वर टेकाळे यांनी वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्याकडे यासंदर्भात प्रकरण दाखल केले. तीन सुनावणीनंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आईच्या प्रकरणात सत्यता आढळून आली. तिन्ही मुलांनी प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण सहा हजार रुपये दरमहा ५ तारखेपूर्वी आईस निर्वाह भत्ता द्यावा, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. आतापर्यंत २७ प्रकरणांत वृद्धांना न्याय मिळवून दिल्याचे टेकाळे यांनी मंगळवारी सांगितले.

कशासंदर्भात करता येईल कॉल?  
आरोग्य जागरूकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम, जीवन व्यवस्थापन आणि दस्तऐवजीकरण, पेन्शनसंबंधीची समस्या जाणवत असल्यास, कायदेविषयक माहिती हवी असेल, घरात चुकीची वागणूक मिळत असेल किंवा इतरही मदतीची गरज असल्यास ज्येष्ठ नागरिक संपर्क साधू शकतात.

Web Title: Refusal of children to care for elderly mother A quick nod to the helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.