पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:02 PM2018-07-27T13:02:17+5:302018-07-27T13:08:09+5:30

वाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे.

Rain stop; The crops grow faster | पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

googlenewsNext
ठळक मुद्देजुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. आता पिके चांगलीच बहरत असून, पावसाच्या उघाडीनंतर पिकांत निंदण, खुरपणाच्या कामाला शेतकºयांनी वेग दिल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडत आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. खरीप पिकांसाठी पाऊस चांगला असला तरी, जुलैच्या मध्यंतरी पावसाने रिपरिप लावल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. सततच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी जमल्याने वाढलेले तणही काढणे कठीण झाले होते. हे तण पिकांसाठी धोकादायक ठरू पाहत होेते. त्यातच अतिपावसामुळे पिके पिवळीही पडू लागली होती. आता तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतशिवार मोकळे झाले आहे. शेतात निंदण, खुरपणाचे काम करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी निंदण, खुरपणाची घाई सुरू केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र हे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पिकांना खत देण्याचीही घाई शेतकºयांनी सुरू केली असून, विविध पिकांसाठी आवश्यक खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर घाई सुरू आहे.

Web Title: Rain stop; The crops grow faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.