एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांची मनमानी; प्रवासी भाडे दीडपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:03 PM2018-06-09T15:03:55+5:302018-06-09T15:03:55+5:30

वाशिम: घोषीत वेतनवाढ मान्य नसल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत. अशात खाजगी वाहतूकदारांनी प्रवासी भाड्यात दीडपटीहून अधिक वाढ करीत प्रवाशांची लूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

private bus owner take advantage in washim | एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांची मनमानी; प्रवासी भाडे दीडपट

एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांची मनमानी; प्रवासी भाडे दीडपट

Next
ठळक मुद्दे एसटी कर्मचारी संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच अचानक संप पुकारला.मंगरुळपीर येथील आगाराच्या ९० टक्के बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कमी तिकिट घेणारे वाहतूकदार आता मात्र संपामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा फायदा घेण्यासाठी दीडपट भाडे वसुल करीत आहेत.

वाशिम: घोषीत वेतनवाढ मान्य नसल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत. अशात खाजगी वाहतूकदारांनी प्रवासी भाड्यात दीडपटीहून अधिक वाढ करीत प्रवाशांची लूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

एसटी महामंडळाने  केलेली वेतनवाढ कर्मचाºयांना मान्य नाही. त्यांनी या संदर्भात ५ जून रोजी एसटी प्रशासनाला पत्रही दिले; परंतु त्याची दखल न घेतल्याने एसटी कर्मचारी संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच अचानक संप पुकारला. या संपाचा फटका सर्वसाधारण जनतेला होत आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यातील बहुतांश बसफेºया बंद असताना मंगरुळपीर येथील आगाराच्या ९० टक्के बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. महत्त्वाच्या कामांना विलंब लागत आहेच शिवाय आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालयात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी परिवहन विभागाने खाजगी प्रवासी वाहतुकीला संपकाळापुरती परवानगीही दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न खाजगी वाहतूकदार प्रामुख्याने प्रवासी वाहतुकदारांकडून होत आहे. साधारणपणे एसटी भाड्यापेक्षा कमी तिकिट घेणारे वाहतूकदार आता मात्र संपामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा फायदा घेण्यासाठी दीडपट भाडे वसुल करीत आहेत. मंगरुळपीर-वाशिम, वाशिम-हिंगोली, वाशिम-अकोला, वाशिम-रिसोड या सर्वच मार्गावर खाजगी वाहतूकदार मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे वसुल करीत आहेत. यामध्ये खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांच्या बसगाड्या, काळीपिवळी टँक्सीसह इतर वाहनधारकांचा समावेश आहे. या प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. 

Web Title: private bus owner take advantage in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.