बसगाड्या झाल्या भंगार; प्लास्टिक दोरीने जोडले जाताहेत एसटीचे निखळलेले भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:40 PM2018-12-06T13:40:54+5:302018-12-06T14:01:00+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. 

Plastic ropes are connected to the steep parts of ST in washim | बसगाड्या झाल्या भंगार; प्लास्टिक दोरीने जोडले जाताहेत एसटीचे निखळलेले भाग

बसगाड्या झाल्या भंगार; प्लास्टिक दोरीने जोडले जाताहेत एसटीचे निखळलेले भाग

Next

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवशाही, शिवनेरीसह इतर अद्ययावत बसगाड्या सुरू केल्या; परंतु पूर्वी विविध आगारात उपलब्ध असलेल्या बसगाड्यांची अवस्था वाईट असताना त्या बदलण्याची तसदी मात्र घेतली नाही.

वाशिम जिल्ह्यातच अशा ब-याच नादुरुस्त बसगाड्या मार्गावर धावत आहेत. काही वेळा या बसगाड्यामध्येच बंद पडत असल्याने खोळंबा होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही बसगाड्यातील आसनांसह इतर सुटे भाग जीर्ण झाल्याने प्रवाशांना त्याचाही त्रास सहन करावा लागतो. बुधवारी जिल्ह्यातून धावणारी वाशिम-अमरावती या बस फेरीच्या रेडीएटरची जीर्ण झालेली जाळी जोडण्यासाठी चालक, वाहकांनी चक्क प्लास्टिक दोरीचा आधार घेतल्याचे पाहायला मिळाले. चालक, वाहकांसह प्रवाशांना होत असलेला हा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जीर्ण बसगाड्या बदलाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.

Web Title: Plastic ropes are connected to the steep parts of ST in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम