महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 03:16 PM2019-03-04T15:16:32+5:302019-03-04T15:16:54+5:30

वाशिम   : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

Planting of the Bel Tree at Padmtirth ocasion of Mahashivratri | महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण 

महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम   : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
बेल हा वृक्ष हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला आहे .  तसेच  महाशिवरात्री निमीत्त बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ºहास थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने बेलाचे जतन करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने हा उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.        वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरितसेनेचे चिमुकले वेदश्री देशमाने , अनुष्का जोशी , साक्षी जाधव ,श्रद्धा धुत , नेहिका गुप्ता , आदित्य पोधाडे , कृष्णा मंत्री , समय इंगळे , समीर शहा , नेहा वानखेडे , रिझा हुसेन ,आरती वाझुळकर , खुशी चौधरी , झुबिया मिर्झा  यांनी मोर्चे सहकार्य केले . कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

Web Title: Planting of the Bel Tree at Padmtirth ocasion of Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.