पांगरी नवघरे पोटनिवडणुकीने वेधले वाशिमा जिल्ह्याचे लक्ष्य; उत्सूकता शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:43 PM2017-12-10T23:43:36+5:302017-12-10T23:44:21+5:30

१३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 

Pangri Navghare aims to be elected by bye-election; Sigale eagerness! | पांगरी नवघरे पोटनिवडणुकीने वेधले वाशिमा जिल्ह्याचे लक्ष्य; उत्सूकता शिगेला!

पांगरी नवघरे पोटनिवडणुकीने वेधले वाशिमा जिल्ह्याचे लक्ष्य; उत्सूकता शिगेला!

Next
ठळक मुद्देप्रचार अंतिम टप्यात तिरंगी लढतीचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : १३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 
तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता  प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.  संपूर्ण जिल्ह्यात पांगरी नवघरे सर्कलची ही पहिली निवडणूक असावी की ज्या निवडणूकमधे भारिप-बमसं वगळता इतर कोणताही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरला नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम यांचे समर्थन घेऊन मनिषा धनंजय माने या निवडणूक रिंगणात आहेत तर भारिप-बमसंतर्फे लता रमेश अवचार आणि अपक्ष म्हणून संगीता सिद्धार्थ खिल्लारे निवडणूक लढवित आहेत. सध्या राज्य व देशात काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांत घमासान सुरू आहे. खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये झालेल्या मारहाणीवरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे तर काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. दुसरीकडे पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये मात्र भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी हातात हात मिसळून निवडणुकीच्या प्रचारात उतरल्याने सर्वांच्या भूवया उंचाविल्या आहेत. 
पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. तिनही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराला गती दिल्याने निवडणुक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापविले असल्याचे दिसून येते. सुरूवातीला प्रमुख चार पक्ष व शिवसंग्राम एकत्र आल्याने ही निवडणूक सरळ-सरळ होईल, असे वाटत होते. मात्र, इतर दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक होत असली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तिनही उमेदवारांचा तोडीस तोड प्रचार असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारेल, याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. 
 

Web Title: Pangri Navghare aims to be elected by bye-election; Sigale eagerness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम