काजळांबा येथे कबड्डी सामन्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:38 PM2017-10-15T19:38:55+5:302017-10-15T19:39:16+5:30

वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित संत मैनापुरी क्रीडा मंडळ व गावकºयांतर्फे काजळांबा येथे ६१ किलो वजन गटाआतील कबड्डीचे सामने २२ आॅक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत.

Organizing Kabaddi at Kajalamba | काजळांबा येथे कबड्डी सामन्याचे आयोजन

काजळांबा येथे कबड्डी सामन्याचे आयोजन

Next
ठळक मुद्देबक्षीसांची लयलूट ६१ किलो वजनगटातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम - वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित संत मैनापुरी क्रीडा मंडळ व गावकºयांतर्फे काजळांबा येथे ६१ किलो वजन गटाआतील कबड्डीचे सामने २२ आॅक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत.
या सामन्याचे उद्घाटन २२ आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ नवघरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, जनरल मॅनेजर मधुकरराव उगले, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूूफ पुंजानी, संघटनेचे सचिव भागवतराव महाले, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय मनवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प्रथम बक्षीस मधुकरराव उगले यांच्यातर्फे २१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस विजय मनवर यांच्यातर्फे १५ हजार रुपये, तृतिय बक्षीस चंद्रकांत बेलखेडे यांच्यातर्फे १० हजार रुपये, चतुर्थ बक्षीस बापुराव उगले यांच्यातर्फे पाच हजार रुपये, पाचवे बक्षीस शिवाजी महाले यांच्यातर्फे तीन हजार आणि सहावे बक्षीस महेश उगले यांच्यातर्फे दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

Web Title: Organizing Kabaddi at Kajalamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा