परजिल्हयातील कांदा वाशिम शहरात; मातीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:42 PM2019-05-08T16:42:53+5:302019-05-08T16:43:14+5:30

वाशिम: शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी परजिल्हयातून आलेले ट्रकचालक रस्त्यावर उभे राहून कांदयाची मातीमोल भावात विक्री करताना दिसून येत आहेत. 

 Onion of the other district sell in washim by low cost | परजिल्हयातील कांदा वाशिम शहरात; मातीमोल भावात विक्री

परजिल्हयातील कांदा वाशिम शहरात; मातीमोल भावात विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी परजिल्हयातून आलेले ट्रकचालक रस्त्यावर उभे राहून कांदयाची मातीमोल भावात विक्री करताना दिसून येत आहेत. 
नाशिक, लासलगाव सह ईतर ठिकाणाहून वाशिम शहरात मोठया प्रमाणात ट्रकचे ट्रक भरुन कांदा आणण्यात आला आहे. बाजारात सद्यस्थितीत नागरिकांना २० रुपये किलोने कांदा खरेदी करावा लागतोय. परंतु मुख्य चौकात उभे राहणारे ट्रक भरुन असलेला कांदा नागरिकांना आकर्षित करीत असल्याने नागरिक सहज भाव विचारण्यासाठी गेला असता संपूर्ण पोते खरेदी करताना दिसून येत आहे.  ३० ते ३५ किलो कांदयाचे पोते २५० ते ३०० रुपयात मिळत असल्याने येथे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. बाजारात २० रुपये किेलो दराने कांदा खरेदी केल्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत कांदा खरेदीकडे शहरावासी आकर्षित होतांना दिसून येत आहे. वाशिम शहरातील जुनी जिल्हा परिषद, अकोला नाका, बसस्थानक चौक , पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका, रिसोड नाका परिसरात सदर ट्रक उभे दिसून येत आहेत.

Web Title:  Onion of the other district sell in washim by low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.