नगराध्यक्षांची मुदतवाढ संपली

By Admin | Published: July 5, 2014 12:21 AM2014-07-05T00:21:08+5:302014-07-05T00:37:21+5:30

आता प्रतीक्षा निवडणुकीची

Mayor's deadline expired | नगराध्यक्षांची मुदतवाढ संपली

नगराध्यक्षांची मुदतवाढ संपली

googlenewsNext

बीड: व्यावसायिक अभ्यासक्रमासह कृषीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे. बीडमध्ये केवळ एकच कृषी महाविद्यालय असल्याने येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे बीडच्या कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे.
येथील आदित्य कृषी महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकी, अन्नतंत्र, अ‍ॅग्रीबायोटिक, कृषी अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. यात जास्तीत जास्त कृषीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एच. भुतडा यांनी सांगितले. येथील महाविद्यालयात कृषी शाखेसाठी एकूण १२० जागा आहेत. यापैकी १८ जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जाणार आहेत तर उरलेल्या ११२ जागा शासकीय कोट्यातून भरल्या जाणार असल्याचे आदित्य महाविद्यालयाचे संचालक आदित्य सारडा यांनी सांगितले. ११२ जागांसाठी आतापर्यंत ३०० च्या आसपास अर्ज आले असून, व्यवस्थापनाच्या १८ जागेसाठी १५० अर्ज आले असल्याचे प्रवेश प्रमुख बी.डी. नागरगोजे यांनी सांगितले. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची तारीख ११ जुलै असून, पहिला राऊंड १७ जुलै रोजी होणार आहे. तसेच व्यवस्थापन कोट्याच्या १८ जागेसाठी १३ आॅगस्ट ते २० आॅगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
येथून आले विद्यार्थी
सध्या उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यांपेक्षा आंध्र प्रदेश राज्यातील विद्यार्थी बीडच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. दररोज १८ ते २० अर्ज येत असल्याचेही प्राचार्य भुतडा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास आमचे प्राध्यापक सहकार्य करीत असल्याचे महाविद्यालयाचे आदित्य सारडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor's deadline expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.