मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:19 PM2019-05-11T16:19:45+5:302019-05-11T16:20:05+5:30

मानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.

Market for turmeric growers in Manora | मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

मानोऱ्यातील हळद उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे गुरुवारी ९ मे पासून हळद या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील हळद उत्पादकांना आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, खरेदीच्या पहिल्याच दिवशी शेतकºयांना ६ हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला आहे. 
मानोरा येथे गेल्या काही वर्षांपासून हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ होत आहे. तथापि, चांगले उत्पादन होऊनही स्थानिक बाजारात या शेतमालाची खरेदी होत नव्हती. परिणामी तालुक्यातील हळद उत्पादकांना हिंगोली किंवा त्यापेक्षा मोठ्या बाजारात हळद विक्रीसाठी घेऊन जावी लागत होती. त्या ठिकाणी प्रसंगी कमी दर मिळाल्यानंतरही शेतकºयांना हळद विकण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे चांगले उत्पादन घेऊनही पदरी फारसे काही पडत नव्हते. स्थानिक बाजारात हळदीची खरेदी व्हावी, अशी अपेक्षा आणि मागणीही तालुक्यातील हळद उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत होती. आता कृषी उत्पन्न बाजार समिती मानोराने या शेतमालाच्या खरेदीचा निर्णय घेऊन हळद उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे हळद खरेदी करणाºया व्यापाºयांची संख्या जास्त असल्याने शेतकºयांना चांगल्या प्रकारे भावही मिळत आहे. खरेदीसाठी जेवढी स्पर्धा तेवढा अधिक भाव शेतकºयांना मिळतो, अशी माहिती बाजार समितीचे सचिव मनोज इंगोले यांनी दिली आहे. आता मानोरा तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकºयांना या शेतमालाच्या विक्रीची सुविधा निर्माण झाली असून, तालुक्यासह जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकºयांनी त्यांनी उत्पदित केलेली हळद विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती हरसिंग चव्हाण व उपसभापती राजेश नेमाने तथा संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Market for turmeric growers in Manora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.