बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:22 PM2019-05-18T18:22:24+5:302019-05-18T18:24:05+5:30

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे.

In market committees traders grain on top insteid farmers | बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे. परिणामी, ओट्याखाली शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करताना शेतमालाची नासाडी होते. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटवा, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली असतानाही अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्याअंतर्गत जवळपास १० ठिकाणी उपबाजार समित्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांसह संचालकांनीदेखील यापूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने व्यापाºयांचा शेतमाल हटविला होता. आता पुन्हा ओट्यांवर व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात आहे. याविरोधात रिसोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी आवाज उठविला आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल न हटविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हीच परिस्थित अन्य बाजार समितीतही असल्याने ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व संचालक पुढे येत आहेत.
 
...तर टाळता येईल नासाडी
ओट्यांवर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवून तेथे हर्रासी केली जाते. ओट्याखाली शेतमाल टाकताना दोन ते तीन किलोदरम्यान शेतमालाची नासाडी होते. याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. ओट्यावर हर्रासी झाली तर शेतमालाची नासाडी होणार नाही. अवकाळी पाऊस आला तर ओट्याखालील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते, याचा अनुभव यापूर्वी शेतकºयांना आला आहे. त्यामुळे ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविणे आवश्यक ठरत आहे.
 
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था केली जाते. या ओट्यांवर शेतकºयांचा शेतमाल ठेवणे आवश्यक आहे. या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात असेल तर याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या जातील. व्यापाºयांनीदेखील ओट्यावर शेतमाल ठेवू नये.
रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

 
ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यासंदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल राहत असल्याने शेतकºयांची गैरसोय होते, असा या निवेदनाचा आशय आहे. या विषयावर चर्चा झाली असून, लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

Web Title: In market committees traders grain on top insteid farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.