वाशिम जिल्ह्यात थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडक मोहिम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:18 PM2017-11-20T16:18:08+5:302017-11-20T16:22:18+5:30

वाशिम: जिल्ह्यातील महावितरणच्या ४८ हजार ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणने सोमवार, २० नोव्हेंबरपासून पुन्हा एकवेळ धडक मोहिम हाती घेतली आहे.

mahavitran campaign to recover outstanding in Washim district! | वाशिम जिल्ह्यात थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडक मोहिम!

वाशिम जिल्ह्यात थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडक मोहिम!

Next
ठळक मुद्दे२५ पथक गठीतदेयक न भरल्यास वीज कपातीची कारवाई

वाशिम: जिल्ह्यातील महावितरणच्या ४८ हजार ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणने सोमवार, २० नोव्हेंबरपासून पुन्हा एकवेळ धडक मोहिम हाती घेतली असून जिल्हाभरात २५ पथक कार्यान्वित करून त्यांच्याकरवी वसूलीस प्रारंभ करण्यात आला आहे. चालू आठवड्यात थकीत देयक भरण्यास टाळाटाळ करणाºयांची वीज कपात केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांनी दिली.

शहरांसह ग्रामीण भागात वाढलेल्या थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या महावितरणने आता मात्र धडक मोहीम राबवून देयक न भरणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामाध्यमातून गत आठवड्यात तीन दिवस मोहिम चालली. त्यात तब्बल १ करोड रुपये वसूल झाले असून ही मोहिम चालू आठवड्यातही राबवून जास्तीत जास्त वसूलीचे उद्दीष्ट महावितरणने बाळगले आहे. त्यानुसार, गठीत करण्यात आलेले कर्मचाºयांचे पथक कामाला लागले असून या मोहिमेचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होवून देयक वसूलीचे प्रमाण वाढेन, असा आशावाद बेथारिया यांनी व्यक्त केला आहे. 

विजचोरांकडून ४० लाख रुपये दंड वसूल!

एकीकडे थकीत देयक वसूल करित असताना दुसरीकडे विजचोरी करणाºयांवरही कारवाईचे सत्र सुरू आहे. दर गुरूवारी राबविल्या जाणाºया मोहिमेंतर्गत गत दोन महिन्याच्या कालावधीत विजचोरांकडून तब्बल ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असून यादरम्यान २०० मीटर ‘फॉल्टी’ असल्याचे आढळून आले, अशी माहितीही अधीक्षक अभियंता बेथारिया यांनी दिली.

Web Title: mahavitran campaign to recover outstanding in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.