तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Published: December 30, 2014 12:40 AM2014-12-30T00:40:38+5:302014-12-30T00:40:38+5:30

महागड्या कीटकनाशकाचा वापर : कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे.

Leprosy Disease | तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

Next

वाशिम : सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी कमालीची घट झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यासमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत तूर या पिकावर मर रोगाच्या व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.
जिल्हय़ातील अनेक भागात मर रोगामुळे तूर या पिकाचे झाड मुळापासून वाळत चालले आहे. ही झाडे मुळापासून वाळत तुरीच्या शेंड्यापर्यंत जात असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही झाडांवर शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटाून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या क्रॉपसॅप पाहणीतही तुरींवरील अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा तमाम शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.
जिल्हय़ात हजारो हेक्टर वर तुरीचे पीक आहे. सध्या तुरीच्या पिकांवर हिरव्या व कोवळय़ा शेंगांना पोखरून टाकणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.
त्यासाठी शेतकरी वर्ग महागडे कीटकनाशक फवारत आहे; परंतु अळय़ांच्या प्रमाण जेवढेच्या तेवढे असल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Leprosy Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.