विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांची वाशिम कारागृहास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:58 PM2018-04-03T15:58:58+5:302018-04-03T15:58:58+5:30

वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ तसेच बार कॉन्सील आॅफ इंडियाच्या नियमानुसार विधी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक प्रशिक्षणाचा भाग म्हणुन कारागृह भेट हा विषय नवीन अभ्यासक्रमात अंतभूर्त करण्यात आलेला आहे.

law College students visit the Washim Jail | विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांची वाशिम कारागृहास भेट

विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांची वाशिम कारागृहास भेट

googlenewsNext
ठळक मुद्देया भेटीदरम्यान कारागृह अधिक्षक चांदणे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. त्यांनी कारागृहाच्या दैनंदीन व्यवहाराबद्दल व कैद्यांच्या कायदेशीर अधिकाराबात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची चांदणे यांनी समर्पकरित्या उत्तरे दिली. 

वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ तसेच बार कॉन्सील आॅफ इंडियाच्या नियमानुसार विधी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक प्रशिक्षणाचा भाग म्हणुन कारागृह भेट हा विषय नवीन अभ्यासक्रमात अंतभूर्त करण्यात आलेला आहे.त् यानुसार अ‍ॅड.रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम कारागृहास भेट दिली.

या भेटीदरम्यान कारागृह अधिक्षक चांदणे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. त्यांनी कारागृहाच्या दैनंदीन व्यवहाराबद्दल व कैद्यांच्या कायदेशीर अधिकाराबात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची चांदणे यांनी समर्पकरित्या उत्तरे दिली.  प्रा.सुशांत चिमणे यांच्या मार्गदर्शनात घडुन आलेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना कारागृहाची प्रत्यक्ष पाहणी करता आल्यामुळे  विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या भेटीदरम्यान वाशिम जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ  अधिवक्ता अ‍ॅड.एस.के.उंडाळ यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. या उपक्रमात प्राचार्य डॉ.नजीर अली कादरी प्रा.ललीता दाभाडे, प्रा.डॉ.सागर सोनी, प्रा.भाग्यश्री धुमाळे,  व विद्यार्थी किशोर पडघान आणि राजेंद्र  गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: law College students visit the Washim Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम